डाळींबाचे पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्त आहे.उन्हाळयातील कडक ऊन आणि कोरडी हवा तसेच हिवाळयातील कडक थंडी डाळिंबाच्यावाढीस योग्य असते. अशा हवामानात चांगल्या प्रतीची फळे तयार होतात परंतु अशा प्रकारच्या हवामानात जरी थोडा फार फरक झाला तरी सुध्दाडाळिंबाचे उत्पन्न चांगले येते. फुले लागल्यापासून फळे होईपर्यंतच्या काळात भरपूर उन व कोरडे हवामान असल्यास चांगल्या प्रकारची गोडफळे तयार होतात. कमी पावसाच्या प्रदेशात जेथे थोडीफार ओलीताची सोय आहे तेथे डाळींबाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.